-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अभिनेत्री वनिता खरात घराघरांत लोकप्रिय झाली.
-
वैयक्तिक आयुष्यात वनिताने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केलं.
-
अभिनेत्री पती सुमित लोंढेबरोबरचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
अलीकडेच वनिताने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास प्लॅनिंग करून त्याला सरप्राईज दिलं होतं.
-
निसर्गरम्य वातावरणातील एका रिसॉर्टमध्ये वनिताने नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला.
-
याचे फोटो सुमितने इन्स्टाग्रामवर शेअर करत या गोड सरप्राईजसाठी बायकोचे आभार मानले आहेत.
-
“या वाढदिवसाला तू मला सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलं आहेस. ही आठवण माझ्या कायम लक्षात राहणार…हे सरप्राईज मला खूप आवडलं धन्यवाद वनिता!” असं कॅप्शन सुमितने या फोटोंना दिलं आहे.
-
वनिता आणि सुमितच्या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, वनिता लवकरच छोट्या पडद्यावरील ‘सुंदरी’ या मालिकेत एन्ट्री घेणार आहे. यामध्ये ती खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.

“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”