-
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपले नाव प्रसिद्ध केले आहे. अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी ऐश्वर्याने मॉडेलिंगमध्ये चांगले स्थान मिळवले आहे. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. यानंतर १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून तिने पदार्पण केले. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
१९९७ मध्येच तिचा बॉलिवूड चित्रपट ‘और प्यार हो गया’ देखील प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
पण तुम्हाला माहित आहे का की मिस वर्ल्ड बनण्याआधी आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ऐश्वर्या तिच्या बालपणात एका टीव्ही जाहिरातीत दिसली होती. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
ऐश्वर्या राय नववीत असताना तिने पहिली टीव्ही जाहिरात केली होती. ती जाहिरात कॅमलिन पेन्सिलची होती. यानंतर ती १९९३ मध्ये आमिर खानसोबत पेप्सीच्या जाहिरातीतही दिसली होती. (फोटो स्त्रोत: कॅमलिन परीक्षा पेन्सिल जाहिरात)
-
ऐश्वर्या राय अभ्यासात खूप हुशार होती. अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला प्राणीशास्त्र विषय आवडतो. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
तिचा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार होता. अभिनेत्रीने सांगितले होते की, जर ती अभिनेत्री नसती तर तिने आपले करिअर फक्त वैद्यकीय क्षेत्रातच निवडले असते. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
ऐश्वर्या रायच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिने बॉलिवूडला ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’ आणि ‘धूम 2’ सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (फोटो स्रोत: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा