-
सनी देओलने यंदा ‘गदर २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटानंतर त्याला अनेक नवीन चित्रपटांसाठी ऑफर आल्या आहेत. अलिकडेच करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सनी आणि त्याचा भाऊ बॉबी देओलला आमंत्रित केले होते. (Still From Koffee With Karan)
-
कॉफी विथ करण सीझन ८ च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करणने देओल ब्रदर्स म्हणजेच सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉबी देओल यांना आमंत्रित केले होते. यादरम्यान करणने सनीशी त्याच्या चित्रपट आणि कारकिर्दीविषयी चर्चा केली. (Still From Koffee With Karan)
-
त्याच्या शोमध्ये करणने सनीशी ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ या दोन चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस क्लॅशबाबत प्रश्न विचारला. करणच्या प्रश्नावर सनी देओलने सांगितले की, त्याने अक्षय कुमारलाही याबाबत फोन केला होता. (Still From Koffee With Karan)
-
सनी म्हणाला, मी अक्षयला फोन केलेला आणि त्याला म्हणालो, बऱ्याच दिवसांनी माझा चित्रपट येतोय. मला वाटतं की माझ्या चित्रपटाबरोबर दुसरा कुठलाही मोठा चित्रपट प्रदर्शित होऊ नये. दोन मोठे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले तर बऱ्याचदा नुकसान होतं. (Still From Koffee With Karan)
-
सनीने सांगितलं की, मी अक्षयला म्हणालो, तुझ्या हातात असेल तर दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होण्यापासून थांबव. (Still From Koffee With Karan)
-
सनीने सांगितलं, अक्षय माझ्या विनंतीवर म्हणाला की त्याच्या हातात काहीच नाही. त्याच्या चित्रपटाचे निर्माते/स्टुडिओने सांगितलं की एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. मी त्याला म्हणालो, ठीक आहे, मी फक्त विनंती करू शकतो. (Still From Koffee With Karan)
-
सनी देओल म्हणाला, “मी विचार केला, बघू पुढे काय होतंय. परंतु, मला आनंद आहे की, दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. (Still From Koffee With Karan)
-
एकाच दिवशी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झालेले ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. ‘गदर २’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५२५.४५ कोटी रुपयांची कमाई केली , तर ‘OMG 2’ ने १५०.१७ कोटी रुपयांची कमाई केली. (Still From Koffee With Karan)

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…