-
अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे.
-
आयरा व नुपूर शिखरे यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी साखरपुडा केला होता. आता वर्षभराने दोघेही लग्नबंधनात अडकतील.
-
आयरा व नुपूर ३ जानेवारीला लग्न करणार आहेत.
-
आमिरच्या लेकीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
-
आयरा व मराठमोळा नुपूर शिखरे यांच्या केळवणाचे पहिले फोटो समोर आले आहेत.
-
खुद्द आयरानेच या पारंपारिक केळवणाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये आयरा व नुपूरची ओवाळणी करण्यात आली.
-
आयरा व नुपूरच्या केळवणासाठी त्यांचे मित्र व मैत्रिणी आल्या होत्या.
-
यावेळी नुपूरने कुर्ता घातला होता. तर आयराने साडी नेसली व नाकात नथ घातली होती.
-
मिथिली पालकर देखील याठिकाणी हजर होती. नुपूर व आयरा यांच्या केळवणातील फोटोंची जोरदार चर्चा आहे.
-
इतकंच नाही तर यावेळी आयराने नुपूरसाठी उखाणाही घेतला.
-
“मला मराठी येत नाही, पण पपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही,” असा उखाणा तिने नुपूरसाठी घेतला. नुपूरला सगळे पपोय नावाने हाक मारतात.
-
या केळवणाच्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
आयरा व नुपूरच्या केळवणात दोघांच्या आईंनीही फोटो काढले. आयराची आई रीना दत्ता साडीत खूप सुंदर दिसत होत्या. तर, नुपूरची आई प्रीतम शिखरे यांनी कुर्ता घातला होता.
-
(सर्व फोटो – आयरा खानच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती