-
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
-
मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली या दोघांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात प्रेक्षकांना अमितचा लेक हृदानची झलक पाहायला मिळाली.
-
अमित भानुशाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.
-
आपल्या लेकाची झलक मालिकेत लवकरच दिसेल हे त्याने आधीच इन्स्टाग्राम पोस्टमधून सुचित केलं होतं.
-
सध्या सायली गरोदर असल्याचा गैरसमज सुभेदार कुटुंबीयांना झालेला आहे. त्यामुळे तिच्या सासूबाई कल्पना सूनेचे लाड करण्यासाठी सायली-अर्जुनच्या खोलीत बाळाचा सुंदर फोटो लावायचा असं ठरवतात.
-
अर्जुनच्या बालपणीच्या फोटोंची मोठी फ्रेम बनवून घेऊया असं कल्पना विमलला सांगते. या सीनमधील फोटोंमध्ये प्रेक्षकांना हृदानची झलक पाहायला मिळाली आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनच्या बालपणीच्या फोटोंमध्ये अमितचा लेक हृदान झळकला आहे.
-
दरम्यान, मालिकेत हृदानची झलक दिसल्याने सध्या अमित भानुशालीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

India vs New Zealand LIVE, Champions Trophy 2025 Final: किवींनी भारताला जेतेपद पटकावण्यासाठी इतक्या धावांचे दिले आव्हान, ब्रेसवेल-मिचेलची उत्कृष्ट अर्धशतकं