-
बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड खूप जुना आहे. आतापर्यंत बॉलीवूडने असे अनेक चित्रपट बनवले आहेत जे साऊथ किंवा हॉलिवूड चित्रपटांचे रिमेक आहेत. यापैकी अनेक रिमेक बॉक्स ऑफिसवर मूळ चित्रपटापेक्षाही जास्त हिट ठरले आहेत. आता हे रिमेक चित्रपट ओटीटीवरही ट्रेंड करत आहेत. (फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)
-
शोले
१९७५मध्ये रिलीज झालेला ‘शोले’ हा हॉलिवूड चित्रपट ‘द मॅग्निफिसेंट सेव्हन’चा रिमेक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. याला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स) -
बाजीगर
१९९३ मध्ये रिलीज झालेला ‘बाजीगर’ हा हॉलिवूड चित्रपट ‘अ किस बिफोर डायिंग’चा रिमेक आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याला IMDb वर 7.6 रेटिंग मिळाले आहे.( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स) -
हेरा फेरी
२००० मध्ये रिलीज झालेला ‘हेरा फेरी’ हा मल्याळम चित्रपट ‘रामजी राव स्पीकिंग’चा रिमेक आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. याला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स) -
मुन्ना भाई एमबीबीएस
२००३ मध्ये रिलीज झालेला ‘मुन्ना भाई M.B.B.S’ हा हॉलिवूड कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘पॅच अॅडम्स’चा रिमेक आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. याला IMDb वर 8.1 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स) -
भूल भुलैया
२००७ मध्ये रिलीज झालेला ‘भूल भुलैया’ हा मल्याळम चित्रपट ‘मणिचित्रथाझू’चा रिमेक आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. त्याला IMDb वर 7.4 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स) -
दृश्यम
२०१५ मध्ये रिलीज झालेला ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट हिट ठरला होता. याला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाले आहे.( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स) -
कबीर सिंग
२०१९ मध्ये रिलीज झालेला ‘कबीर सिंह’ हा तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याला IMDb वर 7.0 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)
-
कबीर सिंग हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याला IMDb वर 7.0 रेटिंग मिळाले आहे. ( फोटो – चित्रपटातून स्क्रिनशॉट्स)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य