-
देशात ओटीटी वापरकर्त्यांची संख्या अलिकडच्या काळात झपाट्याने वाढली आहे. करोना/लॉकडाऊनच्या काळात ओटीटी अॅप्सचं बाजारमूल्य अनेक पटींनी वाढलं. ओटीटीवर चित्रपट-वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्याही कैक पटींनी वाढली आहे. त्यामुळे अनेक निर्माते त्यांचे चित्रपट चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. तर बहुसंख्य निर्माते चित्रपटगृहांमधून चित्रपट उतरल्यानंतर काहीच दिवसांत ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. कारण या चित्रपटांना ओटीटी कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा सात चित्रपटांची माहिती देणार आहोत. ज्यांचे ओटीटी अधिकार खरेदी करण्यासाठी कंपन्यांनी १०० ते ३२० कोटी रुपयांपर्यंतची बोली लावली आहे.
-
KGF: Chapter 2
‘KGF 2’ चित्रपटासाठी प्राइम व्हिडीओने तब्बल ३२० कोटी रुपये मोजले आहेत. (Still From Film) -
Jawan
शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सने २५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. (Still From Film) -
Lakshmi Bomb : अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारने १२५ कोटीं रुपयांमध्ये विकत घेतला होता. (Still From Film)
-
Pathaan
शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्राइम व्हिडीओने १०० कोटींना विकत घेतला होता. (Still From Film) -
Bhuj: The Pride of India : अजय देवगनचा ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट हॉटस्टारने ११० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. (Still From Film)
-
Sadak 2
आलिया भट्ट स्टारर ‘सडक २’ डिस्ने प्लस हॉटस्टारने ७० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. (Still From Film) -
Gulabo Sitabo
अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्राइम व्हिडिओने ६५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतला होता. (Still From Film)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन