-
भिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह कलाकार व चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य-रश्मिका मंदाना, फेसबुक पेज)
-
माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे असं रश्मिका मंदानाने म्हटलं आहे.
-
‘पुष्पा’ सिनेमातल्या श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे रश्मिका घराघरात पोहचलेली अभिनेत्री आहे. हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेक जण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे असं या प्रकरणी रश्मिकाने म्हटलं आहे.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे आणि तिने अतिशय रीलिव्हिंग ड्रेस घातला आहे. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. हा व्हिडीओ रश्मिका मंदानाचा नसून झारा पटेलचा आहे. झारा ही ब्रिटिश-भारतीय वंशाची तरुणी आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला आहे.
-
डीपफेकचा फटका बसलेली रश्मिका ही पहिली अभिनेत्री नाही. याआधीही काही कलाकारांना नको त्या प्रयोगाला सामोरं जावं लागलं आहे.
-
YouTuber जिमी डोनाल्डसन यालाही डीपफेक प्रकरणाला सामोरं जावं लागलं आहे. त्याच्या रुपात AI च्या काही जाहिराती करण्यात आल्या होत्या. टिकटॉकने त्याचा व्हिडीओ समोर आणला होता. (फोटो-जिमी डोनाल्डसन, फेसबुक पेज)
-
स्कारलेट जोहानसनचा चेहरा वापरुन तो चेहरा अॅडल्ट कंटेट असलेल्या एका वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला होता. तिला यातला काहीही प्रकार ठाऊक नव्हता. डीपफेक व्हिडीओमुळे तिलाही अशा प्रकारे फटका बसला आहे. (फोटो सौजन्य- स्कारलेट जोहानसन, फेसबुक)

