-
रश्मिका मंदानाचा काळ्या ड्रेसमधील एक व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. अश्लील पद्धतीने मॉर्फ केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
-
रश्मिका मंदानाचा सांगून व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुळात झारा पटेल या ब्रिटिश-भारतीय तरुणीचा आहे. एआयचे डीपफेक तंत्रज्ञान वापरून रश्मिका मंदानाचा चेहरा झाराच्या त्या व्हिडीओवर लावण्यात आला आहे.
-
झारा पटेल हिने ऑक्टोबर महिन्यात हा व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यावर सहा लाखांहून अधिक लाईक्स व हजारो कमेंट्स आहेत.
-
झाराच्या मूळ व्हिडिओवर अनेकांनी टीका करून अशाप्रकारे प्रसिद्ध होण्यासाठी अंगप्रदर्शन का करता असा प्रश्न केला होता, पण झाराने अशा कोणत्याच कमेंट्सना काहीही उत्तर दिलेले नाही.
-
झाराचे बहुसंख्य व्हिडीओ हे त्याच लिफ्टमधील आहेत जी आता रश्मिकाच्या मॉर्फ व्हिडीओमध्ये सुद्धा दिसून येतेय
-
झारा इन्स्टाग्रामवर खूपच प्रसिद्ध असून तिचे तब्बल ४ लाख ४५ हजार फॉलोवर्स आहेत. ती स्वतः सद्गुरू यांच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करते.
-
झाराच्या अकाउंटच्या बायोमधील काही लिंक्सनुसार ती अडल्ट वेबसाईट्ससाठी मॉडेलिंग सुद्धा करते हे समजतंय
-
झारा ही व्यवसायाने एक फुल टाइम डेटा इंजिनिअर आहे.
-
‘डीपफेक’ म्हणजे आर्टिफिकल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेले फोटो, व्हिडिओ, आवाज किंवा मजकूर. “डीप” हे “डीप लर्निंग” मधून आले आहे, यामध्ये एका व्यक्तीचा डिजिटल कॉन्टेन्ट अन्य व्यक्तीच्या कॉन्टेन्टसह बदलला जातो. या तंत्रज्ञानाने केवळ झारा व रश्मिकाच नव्हे तर अन्य अनेक सेलिब्रिटींचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ इंस्टाग्राम)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा