-
Happy Birthday Kamal Haasan : कमल हासन या दिग्गज अभिनेत्याची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. ७ नोव्हेंबर १९५४ या दिवशी एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले कमल हासन आज ६९ वर्षांचे झाले आहेत. कमल हासन यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या सात विक्रमांची माहिती देणार आहोत. (Photo: Express Archive)
-
१ कोटी रुपयांहून अधिक मानधन घेणारे कमल हासन हे पहिला भारतीय अभिनेते आहेत. १९९४ मध्ये ते १ ते १.५ कोटी रुपये मानधन घेत होते. (Photo: Express Archive)
-
कमल हासन यांना आतापर्यंत १९ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २० व्यांदा त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे हे समजल्यावर त्यांनी स्वत:च आपलं नाव मागे घेतले. आता नव्या कलाकारांना संधी मिळाली पाहिजे, असे सांगत त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. १९ फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारे ते एकमेव अभिनेते आहेत.(Photo: Express Archive)
-
कमल हासन हा एकमेव अभिनेते आहेत ज्यांचे ७ चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये सागर, स्वाती मुत्यम, नायकन, थेवर मगन, कुरुथीपुनल, इंडियन आणि हे राम या चित्रपटांचा समावेश आहे.(Photo: Express Archive)
-
कमल हासन चित्रपटात स्वतःचे स्टंट स्वतः करण्यावर भर देतात. चित्रपटांसाठी स्टंट करताना त्यांनी ३४ हाडे मोडून घेतली आहेत. हा एक विक्रम आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जॅकी चॅन आहे, ज्याने २० हाडं मोडून घेतली होती. (Photo: Express Archive)
-
कमल हासन यांच्या एका चाहत्याने धाग्यांचा वापर करून त्यांचे ७ फूट उंच पोर्ट्रेट बनवले होते. या पोर्ट्रेटसाठी कमल हासन आणि त्यांच्या चाहत्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.(Photo: Express Archive)
-
कमल हासन यांनी वयाच्या ६ व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कारही मिळाला होता. इतर कोणत्याही अभिनेत्याने ही कामगिरी केलेली नाही. (Photo: Express Archive)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…