-
‘ठरलं तर मग’ या मालिकेने नुकतेच नाबाद ३०० भाग पूर्ण केले.
-
अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवत टीआरपीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
-
ऑक्टोबर महिन्यात आलेल्या टीआरपीच्या रिपोर्ट्सनुसार ‘ठरलं तर मग’ ही महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली होती.
-
मालिकेने ३०० भागांचा टप्पा गाठल्यावर यातील कलाकारांनी सेटवर केक कापून सेलिब्रेशन केलं.
-
मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अस्मिताने म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेने सेटवरच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अस्मिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मालिकेतील कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
-
मालिकेत सायलीला त्रास देणाऱ्या प्रिया व अस्मिता खऱ्या आयुष्यात जुई गडकरीच्या खूप चांगल्या मैत्रिणी असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे.
-
‘ठरलं तर मग’ या मालिकेला येत्या डिसेंबरमध्ये १ वर्ष पूर्ण होणार आहे.
-
दरम्यान, या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, मोनिका दबडे, ज्योती चांदेकर, प्रियांका दिघे अशा दिग्गज कलाकारंनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच