-
Who is Orry: ‘ऑरी’ या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा ओरहान अवत्रामणी हा बॉलिवूड BFF म्हणून ओळखला जातो. जान्हवी कपूर, अनन्या पांडे ते अगदी नीता अंबानींपर्यंत अनेक सेलिब्रिटींसह ऑरीचे फोटो व्हायरल होत असतात.
-
दरदिवशी ऑरीचे फोटो व्हायरल होत असूनही तो नेमका आहे कोण? करतो काय? याविषयी अनेकांना प्रश्न पडला आहे. त्याच्या प्रत्येक व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करून हेच प्रश्न विचारले आहेत
-
तर कोण आहे हा ऑरी? त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, ऑरीने त्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी सांगितली आहे. पण त्याने कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “मला एकदा खूप कंटाळा आला होता आणि मी माझ्या इंस्टाग्राम बायोमध्ये ऍक्टिव्हिस्ट असा शब्द जोडला होता, गंमतीतच त्यामुळे मी प्रत्यक्षात ऍक्टिव्हिस्ट नाही
-
ऑरीने न्यूयॉर्कच्या पार्सन्स स्कूल ऑफ डिझाईनमधून ललित कला (फाईन आर्ट्स) आणि कम्युनिकेशन डिझाइनमध्ये पदवी घेतली आहे
-
एका मुलाखतीत ऑरीने सांगितले की, “मी खूप काम करतो पण माझं काम ९ ते ५ सारखे नाही मी स्वतःवर कष्ट घेतो. मी जिमला जातो, मी खूप आत्मचिंतन करतो, कधी कधी मी योगा करतो, मी मसाजसाठी जातो, मी काम करतो पण मी स्वतःवर काम करतो”
-
कॉस्मोपॉलिटिनच्या मुलाखतीदरम्यान, ऑरीने सांगितले की तो अनेकदा सेलिब्रिटींसोबत दिसतो परंतु त्यापैकी काही त्याचे मित्र आहेत. काही जण त्याला शाळेपासून ओळखतात, इंडस्ट्रीत फक्त भूमी पेडणेकर हीच त्याची मैत्रिण आहे.
-
ऑरीने सांगितले की, हॉलिवूड सेलिब्रिटी कायली जेनर हिच्याबरोबर काढलेल्या फोटोमुळे तो जास्त प्रसिद्ध झाला. तो त्याच्या वाढदिवसाला कायलीच्या घरी गेला होता तेव्हा त्यांनी फोटो काढला व पोस्ट केला ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले
-
पॉडकास्टच्या प्रोमोमध्ये त्याला “मार्केटिंगमधील तज्ज्ञ” म्हणण्यात आले होते. त्याने सांगितले की, त्याने यापूर्वी काही वेळा वेटर म्हणूनही काम केले आहे
-
काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्ससह केलेल्या एका व्हिडिओमध्ये ऑरीने नेटकऱ्यांच्या प्रश्नावर (कोण आहे ऑरी) कमेंट केली होती. त्यात मला कोण आहे विचारण्यापेक्षा मी कसा आहे हे विचारा असंही ऑरीने म्हटलं होतं. ऑरीच्या या व्हिडीओवर सुद्धा अनेकांनी कमेंट केल्या होत्या, जान्हवी कपूरने तर यावर ऑरी हा सगळं काही आहे असंही म्हटलं होतं.(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा