-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘अधिपती’ म्हणजेच अभिनेता हृषिकेश शेलारने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
हृषिकेशने दिवाळीच्या काही आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.
-
शाळेच्या सुट्टीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड, राजगड आणि अशा इतर काही किल्ल्यांवर सहलीला जायचो आणि तिथे फराळ करायचो.
-
फक्त परिवारातील नाही तर कॉलनीमधली सगळे या सहलीमध्ये सामील असायचे पण आता शूटिंगमुळे हे सर्व शक्य नाही.
-
मला लक्ष्यात आहे, २०१७ ची दिवाळी मी कुटुंबाबरोबर अमेरिकेत होतो आणि आम्ही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये बसून फराळ खाल्ला होता आणि मग ब्रॉडवेत नाटक पहिले होते.
-
शूटिंगमुळे या वर्षी माझी दिवाळी मुंबईमध्ये साजरी होणार आहे.
-
या दिवाळीत आई-बाबा घरी येणार आहेत. माझ्या मुलीची पहिली दिवाळी आहे.
-
रुही १० महिन्याची आहे आणि तिच्यामुळे आमची सर्वांची दिवाळी खास असणार आहे.
-
पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, रूहीचं पाऊल घरात पडले आणि माझे आयुष्य बदलून गेले.
-
मला झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये पहिल्यांदा नायकाची भूमिका साकारायला मिळाली.
-
मला कडक चकल्या आवडतात आणि माझी आई माझ्यासाठी खास त्या बनवते.
-
मला सख्खी बहीण नाही पण माझ्या मावस बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी सारख्या आहेत.
-
भाऊबीजेच्या दिवशी आमच्या कडे मटणाचा बेत असतो आणि ते ठरलेले आहे आम्ही सर्वे झणझणीत मटणावर ताव मारतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : हृषिकेश शेलार / इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…