-
Uday Kotak Son Jay Marries Former Miss India Aditi Arya : अब्जाधीश बँकर आणि उद्योगपती उदय कोटक यांचा मुलगा जय कोटकचा विवाहसोहळा ७ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडला.
-
जय कोटकने २०१५ मधील मिस इंडिया आदिती आर्याशी लग्नगाठ बांधली. जय व अदितीचं लग्न मुंबईतील अंबानींच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालं.
-
जय कोटक आणि अदिती आर्या यांच्या लग्नसोहळ्याला अंबानी कुटुंबासह प्रसिद्ध उद्योगपतींनी हजेरी लावली होती.
-
जय कोटक आणि अदिती बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
दोघांनी मे महिन्यात एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता.
-
आदिती आर्याचा जन्म १८ सप्टेंबर १९९३ रोजी झाला, तिचे बालपण चंदीगडमध्ये गेले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. नंतर तिने अमेरिकेतून एमबीए केलं.
-
जय कोटक आणि अदिती यांची भेट अमेरिकेतच झाली होती. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही आपलं नातं बऱ्याच काळापूर्वी सार्वजनिक केलं होतं.
-
२०१५ मध्ये अदितीने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
-
आदितीने ‘इसम’ या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने ‘८३’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केले होते.
-
उदय कोटक यांचा मुलगा जय कोटक याने कोलंबिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली आहे.
-
कोटक महिंद्रा बँकेची डिजिटल पहिली मोबाइल बँक, कोटक 811 ची जबाबदारी जयवर आहे. याशिवाय तो वडिलांना कोटक महिंद्रा बँकेच्या बिझनेसमध्ये मदत करतो.
-
उदय कोटक हे भारतातील १० व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार उदय कोटक यांची एकूण संपत्ती १.१५ लाख कोटी रुपये आहे. (सर्व फोटो – जय कोटक व अदिती आर्या इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”