-
प्रभास व क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा यंदाचा सर्वात वादग्रस्त ठरलेला चित्रपट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (सर्व फोटो – मनोज मुंतशिर इन्स्टाग्राम)
-
या ऐतिहासिक चित्रपटातील संवाद व ग्राफिक्स प्रेक्षकांना अजिबात भावले नाही आणि त्यांनी चित्रपटाला प्रचंड ट्रोल केलं.
-
या चित्रपटाचा संवाद लेखक मनोज मुंतशिरवरही प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मनोजला काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घ्यावा लागला होता.
-
आता त्याने संपूर्ण वाद आणि लोकांनी केलेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे. तसेच आपली लिखाणात चूक झाल्याचं मनोजने मान्य केलं आहे.
-
लिखाणात माझी १०० टक्के चूक झाली आहे. मी इतका असुरक्षित माणूस नाही की मी चांगले लिहिलंय असं सांगून माझ्या लेखन कौशल्याचा बचाव करेन. – मनोज मुंतशिर
-
पण त्या चुकीमागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. माझा कोणत्याही धर्माला दुखावण्याचा आणि सनातनला त्रास देण्याचा, प्रभू रामाची बदनामी करण्याचा किंवा हनुमानजींबद्दल वाईट बोलण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. – मनोज मुंतशिर
-
माझी एक चूक झाली, ती मोठी होती आणि त्यातून मी खूप काही शिकलो आहे. पण यापुढे मी खूप काळजी घेईन. – मनोज मुंतशिर
-
मी माणूस आहे.. दगड नाही.. प्रेत नाही.. प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो. जेव्हा तुमच्यावर आरोप होतात, लोक वाईट बोलतात, तेव्हा माणूस दुखावतो. पण त्याला सामोरं जायला शिकलं पाहिजे. – मनोज मुंतशिर
-
मला लोकांकडून अशी प्रतिक्रिया येईल असं कधीच वाटलं नव्हतं. हा चित्रपट अतिशय चांगल्या हेतूने बनवला गेला होता. – मनोज मुंतशिर
-
जर या चित्रपटासाठी ६०० कोटी रुपये गुंतवले गेले असतील, तर तो सर्वोत्कृष्ट व्हावा, अशीच त्यामागची इच्छा असते. असा चित्रपट करून आपलं करिअर कोणाला संपवायचं आहे? यामागे आमचा कोणताही अजेंडा नव्हता. – मनोज मुंतशिर
-
मनोजने चित्रपटासंदर्भात वाद सुरू असताना स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली होती, ते करायला नको होतं, असं त्याला वाटतं.
-
मला असं वाटतं की जेव्हा गोष्टी इतक्या जोरात सुरू होत्या, तेव्हा मी स्पष्टीकरण द्यायला नको होतं. ही माझी सर्वात मोठी चूक होती. – मनोज मुंतशिर
-
त्यावेळी मी बोलायला नको होते. यामुळे लोकांना राग असेल तरी त्यांचा राग रास्त आहे. कारण स्पष्टीकरण देण्याची ती वेळ नव्हती आणि आता मला माझी ती चूक समजली – मनोज मुंतशिर
-
चित्रपटामुळे वाद झाल्यानंतर मला हिंदूंचा पाठिंबा मिळाला. तुम्ही फक्त सोशल मीडियावर पाहत असाल तर ते जग नाही. मला खरंच अनेक लोकांनी पाठिंबा दिला. – मनोज मुंतशिर
-
काही लोकांचा राग फक्त क्षणिक होता. आमचा कोणताही वाईट हेतू नव्हता हे त्यांनाही लक्षात आलं. खरं तर मला लोकांचा पाठिंबा नसता, तर मी आज इथे उभाही नसतो, असं मनोज म्हणाला.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”