-
सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित चित्रपट ‘टायगर ३’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’प्रमाणेच या चित्रपटातही प्रेक्षकांना सलमान खानचे अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत.
-
अगोदरच्या दोन्ही चित्रपटांची कमाई पाहता ‘टायगर ३’सुद्धा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करेल अशी चर्चा सुरू आहे.
-
दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सलमानचे चाहते याची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपट बरीच सरप्राइज प्रेक्षकांना मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जाणार असाल तर या ९ गोष्टींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण या ९ गोष्टी ‘टायगर ३’मधील सर्वात चर्चेत असलेल्या गोष्टी आहेत.
-
चित्रपटातील अॅक्शन सीन्स : ‘टायगर 3’च्या अॅक्शनवर हॉलिवूडच्या काही बड्या अॅक्शन दिग्दर्शकांनी मिळून काम केलं आहे. शाहरुख-सलमानचा अॅक्शन सीन तर तीन दिग्दर्शकांनी मिळून डिझाईन केला आहे. मध्यंतरी चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी पाष्ट केले होते की, यात एक-दोन नाही तर १२ अॅक्शन सीन असणार आहेत जे प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत.
-
सलमानची एन्ट्री : ‘टायगर ३’मधला सलमान खानचा एन्ट्रीचा सीन १० मिनिटांचा असेल अशी चर्चा आहे. यात खूप पजबरदस्त स्टंट्स असणार आहेत शिवाय यात स्पेशल इफेक्ट्सचाही वापर करण्यात आला असल्याचं मध्यंतरी मनीष शर्माने सांगितलं होतं.
-
शाहरुख खानचा २५ मिनिटांचा कॅमिओ : ‘टायगर ३’मध्ये शाहरुख खान दिसणार आहे हे ‘पठाण’पासूनच स्पष्ट झालं होतं. तेव्हापासूनच चाहते ‘स्पाय युनिव्हर्स’मधील या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. ‘पठाण’मध्ये सलमानचा ८ ते १० मिनिटांचा कॅमिओ होता. आता ‘टायगर ३’मध्ये शाहरुख खान पठाण म्हणून झळकणार आहे, इतकंच नव्हे तर शाहरुखचा हा कॅमिओ तब्बल २५ मिनिटांचा असणार आहे. चित्रपटात सलमान आणि शाहरुखचा एकत्र अॅक्शन सिक्वेन्सपण आहे ज्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
-
शाहरुख व सलमान जाणार पाकिस्तानला : ‘टायगर 3’मध्ये सलमान आणि शाहरुख जेल ब्रेकच्या सीक्वेन्समध्ये एकत्र दिसणार आहेत. जेल ब्रेकचा हा सीक्वेन्स पाकिस्तानमधला असणार आहे अशी चर्चा आहे. ‘टायगर’ला पाकिस्तानच्या तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी ‘पठाण’ पाकिस्तानात जाऊन दोघेही तिथून बाहेर पडणार असा एक सीन चित्रपट दिसणार असल्याची चर्चा आहे.
-
कतरिनाचा जबरदस्त अॅक्शन सीन :सलमान शाहरुखबरोबरच कतरिना कैफसुद्धा जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. एका महिलेबरोबरचा हमाममधील फक्त टॉवेल परिधान करून कतरिना अॅक्शन करतानाच्या सीनची तर जबरदस्त चर्चा आहे. याबरोबरच या चित्रपटासाठी केलेली अॅक्शन ही फार थकवणारी आणि अवघड असल्याचं खुद्द कतरिनानेच सांगितलं आहे.
-
हृतिक रोशनचा कॅमिओ : हा चित्रपट ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’चा भाग असल्याने यामध्ये शाहरुखबरोबरच ‘वॉर’ चित्रपटातील हृतिक रोशनचं कबीर हे पात्र सुद्धा दिसणार आहे. हृतिक रोशनने यासाठी नोव्हेंबरमध्ये चित्रीकरण केलं असून हा चित्रपटातील पोस्ट क्रेडिट सीन असणार आहे ज्यात हृतिकची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हृतिकच्या कॅमिओसाठी सुद्धा प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
-
ज्युनिअर एनटीआरचीही होणार एन्ट्री : याच स्पाय युनिव्हर्सच्या पुढील म्हणजेच ‘वॉर २’चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे आणि यात ज्युनिअर एनटीआर हा नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता ज्युनिअर एटीआरच्या पात्राची तोंडओळख ‘टायगर ३’मध्ये खुद्द सलमान करून देणार असल्याची चर्चा आहे. अद्याप याबद्दल पुष्टी झालेली नाही त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच नेमकं सत्य समोर येईल.
-
गोपीचा कमबॅक : ‘एक था टायगर’मध्ये रणविर शोरेने साकारलेलं ‘गोपी’ हे पात्र चांगलंच गाजलं होतं. आता ‘टायगर ३’मध्ये ते पात्र पुन्हा एन्ट्री घेणार असल्याने प्रेक्षक यासाठीही उत्सुक आहेत.
-
इम्रान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत : चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही इम्रान हाशमीच्या पात्राबद्दल फारसं काहीच दाखवलं गेलं नसल्याने सगळ्यांनाच इम्रानच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटात इम्रान ‘वॉर’मधील टायगर श्रॉफच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं आहे, परंतु एकूणच यातील इम्रान हाशमीचा लूक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला असून त्याच्या खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस व सोशल मीडिया)
Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images