-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘अक्षरा’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी रंगोळेने दिवाळीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
-
माझ्या तीन मावशी आणि आम्ही सर्व भावंडं एकत्र येऊन फराळ बनवायचो या गोष्टी सध्या मी फार मिस करत आहे.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमुळे यावर्षी कामात खूप गुंतलेली आहे.
-
सुट्टी मिळाली तर मी आणि विराजास पुण्याला जाऊ माझ सासर आणि माहेर दोन्ही पुण्यातच आहे.
-
सर्व कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करू आणि सुट्टी नाही मिळाली तर मुंबईतच मित्र मंडळींना घरी फराळासाठी बोलवणार आहोत.
-
फराळ करत मित्र मंडळींबरोबर भरपूर गप्पा गोष्टी करू.
-
मला दिवाळीत भाऊबीजेचा दिवस खूप आवडतो.
-
आम्ही सगळे भावंडं जे आता कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात राहतात ते या दिवशी व्हिडीओ कॉलमध्ये एकत्र येतो.
-
एकामेकांच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे याबद्दल बोलतो.
-
एकूण काय तर मी दिवाळीत परिवार आणि मित्र मंडळीबरोबर साजरी करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रंगोळे / इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ