-
महानायक अमिताभ बच्चन व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
अमिताभ बच्चन जया यांना कोणत्या नावाने हाक मारतात, याबाबतचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे.
-
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बिहारचे सुजित कुमार पोहोचले होते. बिग बी होस्ट करत असलेल्या शोमध्ये ते आपल्या पत्नीबरोबर आले होते.
-
सुजित यांनी आपण पत्नीला मॅडम म्हणून हाक मारत असल्याचं सांगितलं. तसेच त्याने बिग बींना प्रश्नही विचारला.
-
आपणही आधी जया बच्चन यांना मॅडम म्हणून हाक मारायचो, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
-
आता तुम्ही त्यांना कोणत्या नावाने हाक मारता असं सुजितने विचारलं.
-
उत्तर देत बिग बी म्हणाले, “मी त्यांना देवीजी म्हणून हाक मारतो.”
-
अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी १९७३ साली लग्न केल होतं. त्यांना श्वेता व अभिषेक ही दोन अपत्ये आहेत.
-
(सर्व फोटो – श्वेता बच्चन इन्स्टाग्रामवरून साभार)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल