-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व सलमान खान या दोघांचे लव्ह हेट रिलेशनशिप जगजाहीर आहे.
-
एकेकाळी जीवापाड प्रेम करणारे हे दोघं आता एकमेकांसमोरही येत नाहीत.
-
नुकत्याच पार पडलेल्या लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दोघं एका छताखाली पाहायला मिळाले.
-
पण ऐश्वर्या या पार्टीतून लवकर निघून गेली.
-
सलमान या पार्टीत असल्यामुळे ऐश्वर्या जास्त वेळ थांबली नाही, असं म्हटलं जात होतं.
-
पण बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने पार्टीतून लवकर निघायचे हे आधीच ठरवलं होतं. कारण ती एकटीच बच्चन कुटुंबीयांकडून पार्टीत सहभागी झाली होती.
-
तसेच तिचे मनिष मल्होत्राबरोबर चांगलं नात आहे. त्यामुळे ती काही वेळासाठी पार्टीत पोहोचली होती.
-
या पार्टीतला एक फोटो सोशल मीडियावर खूप झाला. ज्यामध्ये ऐश्वर्या व सलमान असल्याचं म्हटलं गेलं.
-
या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. हा फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी संजय लीला भन्साळी यांना ‘हम दिल दे चुके सनम २’ या चित्रपटाची मागणी देखील केली.
-
पण या व्हायरल फोटोमागचं सत्य मात्र वेगळंच होतं.
-
या फोटोमध्ये सलमान खानला मिठी मारणारी ही व्यक्ती ऐश्वर्या राय-बच्चन नसून भलतीच होती.
-
अभिनेता सूरज पांचोलीची बहीण सना पांचोली या फोटोमध्ये होती; जी सलमान खानला मिठी मारताना दिसली होती.
Crime News : परीक्षेत २०० पैकी १८४ गुण… सब-इन्स्पेक्टरच्या रजेच्या अर्जात एक चूक अन् मोठा घोटाळा झाला उघड