-
बॉलिवूड चित्रपट जगभर लोकप्रिय आहेत. बॉलिवूड चित्रपटांच्या कथा आणि गाणी लोकांना आवडतात. ही लोकप्रियता लक्षात घेऊन काही वेळा बॉलिवूड चित्रपटांवर गेम्स बनवले गेले.(Still From Film)
-
चित्रपटावर आधारित गेम्स नेहमी यशस्वी होतातच असे नाही. काही गेम लॉन्च होताच अयशस्वी झाल्याचं आपण पाहिलं आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा काही बॉलिवूड चित्रपटांबद्दल ज्यावर गेम बनवले गेले आहेत. (Still From Film)
-
रा.वन
शाहरुख खानच्या ‘रा.वन’ या चित्रपटावर आधारित ‘रा-वन: द गेम’ नावाचा गेम बनवण्यात आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, परंतु त्याचा गेम तरुणांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. (Still From Film) -
क्रिश
हृतिक रोशनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘क्रिश’वर आधारित ‘क्रिश: द गेम’ लाँच करण्यात आला. पण ग्राफिक्सने भरलेला हा गेम मुलांना आणि गेमिंग करणाऱ्यांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. (Still From Film) -
गजनी
आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटावरही एक गेम बनवण्यात आला होता. आमिरचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला पण या चित्रपटावर बनवलेला गेम काही कमाल करू शकला नाही. (Still From Film) -
धूम ३
आमिर खानच्या ‘धूम 3’ या चित्रपटावरही एक गेम बनवण्यात आला होता. हा चित्रपट देखील ‘गजनी’प्रमाणे ब्लॉकबस्टर ठरला, परंतु त्याचा गेम वापरकर्त्यांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. (Still From Film) -
डॉन 2
शाहरुख खानचा ‘डॉन २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण त्यावर आधारित गेम लोकांना आवडला नाही. (Still From Film)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका