-
सौंदर्य, उत्तम नृत्य कौशल्य आणि अभिनय गुणांनी समृद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्रातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
७ मे २०२१ रोजी दुबईत सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. यानंतर तिने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
सोनाली आपल्या पतीसह सर्वच सण साजरे करते. यासंबंधीचे वेगवेगळे फोटो ती आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने कुणालबरोबरचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांनी दुबईत एकत्र दिवाळी साजरी केली आहे.
-
यावेळी सोनालीने रांगोळी काढतानाही फोटो काढले आहेत.
-
सोनालीने मोरपिसी रंगाची साडी आणि कुणालने सोनालीला मॅचिंग कुर्ता घातला आहे.
-
सोनाली आणि कुणालचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यापेक्षाही सोनालीच्या साडीवरील डिझाईनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
-
सोनालीच्या मोरपिसी साडीवरील पदरावर देवी अंबाबाईची प्रतिकृती रेखाटली आहे.
-
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सच्या रुपात कौतुकाचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो : @yashkaklotar/इन्स्टाग्राम)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य