-
९०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जूही चावला होय.
-
आज १३ नोव्हेंबर रोजी जूही तिचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
१९८४ साली जूहीने ‘मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता.
-
त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
-
१९८८ मध्ये जुहीने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानबरोबर काम केलं. या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली.
-
यानंतर तिने करिअरमध्ये मागे वळून पाहिलं नाही. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट करत असतानाच तिने १९९५मध्ये उद्योगपती जय मेहताशी लग्न केले.
-
त्यावेळी जय मेहता ३३ वर्षांचे होते. त्यांचं हे दुसरं लग्न होतं. जूही जय यांच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे.
-
जय मेहता मुंबईमधील मोठे उद्योगपती आहेत. ते मेहता ग्रुपचे मालक आहेत. त्यांची कंपनी परदेशातही अनेक कामं करते.
-
-
जुही पहिल्यांदा जय यांना भेटली तेव्हा त्यांची पत्नी सुजाता बिर्ला यांचे निधन झाले होते. सुजाता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.
-
१९९२ मध्ये जुही ‘करोबार’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि उद्योगपती जय मेहता यांच्यात खूप चांगली मैत्री होती.
-
राकेश रोशनमुळेच जूही व जय यांची भेट झाली.
-
शूटिंगदरम्यान जुही-जय अनेकवेळा भेटले. मात्र, त्यावेळी दोघांनीही एकमेकांबद्दल कोणत्याही भावना नव्हत्या.
-
जय यांच्या पत्नीचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे जूहीला समजल्यावर तिची वागणूक बदलली.
-
दोघांमध्ये मैत्री वाढली आणि नंतर ते एकमेकांच्या जवळ आले.
-
दोघे लग्न करण्याच्या विचारात होते, तेव्हा जूहीच्या आईचा एका कार अपघातात मृत्यू झाला. या अपघाताने जूहीला धक्का बसला. तिला लग्नाबाबत कोणताही निर्णय घेता येत नव्हता.
-
या काळात जय यांनी जूहीला खूप मदत केली. अखेर १९९५ मध्ये जूही व जय यांचे लग्न झाले. दोघांना मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन अशी दोन अपत्ये आहेत.
-
(सर्व फोटो – जूही चावला इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच