-
संगीत क्षेत्रात शिंदेशाहीचं मोलाचं योगदान आहे. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाहीचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चाहता वर्ग आहे.
-
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे.
-
आपल्या भारदस्त आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला थिरकायला लावणाऱ्या शिंदे कुटुंबाने आता उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
-
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शिंदेशाहीने उद्योग क्षेत्रात पदार्पण करून स्वतःचा पेट्रोल पंप सुरू केला आहे.
-
गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियाद्वारे या पेट्रोल पंपची माहिती दिली आहे.
-
आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकलेला आदर्श आनंद शिंदे याच्या नावाने हा नवा पेट्रोल पंप सुरू केला आहे.
-
पंढरपुरमधील वेळापूर येथे शिंदे कुटुंबाने हा पेट्रोल पंप सुरू केला आहे.
-
शिंदे कुटुंबियांच्या या पहिल्या पेट्रोल पंपाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
तसेच शिंदेशाहीने उचलेल्या या पाऊलाचं कौतुक देखील होतं आहे.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…