-
रितेश देशमुख आणि जिनिलीयाची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनाही रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.
-
सध्या देशमुख कुटुंबीय दिवाळी एकत्र साजरी करण्यासाठी लातूरला त्यांच्या मूळ घरी गेले आहेत.
-
रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी दिवाळीनिमित्त त्यांचं घर कसं सजवलं याची खास झलक जिनिलीयाची वहिनी दीपशिखा देशमुखने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
दीपशिखाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये रियान व राहील त्यांच्या इतर भावंडांसह दिवाळीची सजावट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
रितेशच्या मुलांनी संपूर्ण घर मातीचे लहान दिवे आणि झेंडूच्या फुलांनी सजवलं आहे.
-
या सगळ्या फोटोंमध्ये देशमुखांच्या घरच्या दिवाळीची खास झलक त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली.
-
दिवाळीनिमित्त जिनिलीयाने पहाटे दोन्ही मुलांना अभ्यंगस्नान घातलं होतं. यानंतर दोघांनी नवीन कपडे घालून परंपरेनुसार संपूर्ण घरात सजावट केली.
-
दीपशिखाने मुलांनी केलेल्या सजावटीचा व्हिडीओ शेअर करत त्याला “आमची लातूरमधली दिवाळी!” असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, देशमुखांच्या घरच्या दिवाळीचे फोटो व व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा रितेश-जिनिलीयाच्या मुलांच्या संस्कारांचं कौतुक केलं आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…