-
भारतात १४ नोव्हेंबरला ‘बालदिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने ‘झिम्मा २’मधील कलाकारांचे बालपणीचे फोटो दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘झिम्मा २’ येत्या २४ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी यामधील कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहूयात…
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या चित्रपटात ट्रिप आयोजन करणाऱ्या ‘कबीर’ची भूमिका साकारत आहे.
-
रिंकू राजगुरू ‘झिम्मा’च्या पहिल्या भागात नव्हती. आता चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये ती तानिया हे निर्मिती सावंत यांच्या सुनेचं पात्र साकारणार आहे.
-
अभिनेत्री सायली संजीवच्या भूमिकेचं नाव चित्रपटात कृतिका असं आहे.
-
रिंकूप्रमाणे अभिनेत्री शिवानी सुर्वेचीही ‘झिम्मा २’ मध्ये नव्याने एन्ट्री झाली आहे.
-
अभिनेत्री क्षिती जोग चित्रपटात मीताच्या भूमिकेत दिसेल.
-
सुचित्रा बांदेकर आणि निर्मिती सावंत या दोन आघाडीच्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत.
-
चित्रपटात सुचित्रा बांदेकर ‘वैशाली’, तर निर्मिती सावंत ‘निर्मला’ हे पात्र साकारणार आहेत. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( सर्व फोटो सौजन्य : हेमंत ढोमे इन्स्टाग्राम )
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज