-
‘बिग बॉस’च्या घरातील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
दोघांचा शाही विवाहसोहळा १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे.
-
प्रसाद-अमृताच्या लग्नविधीला सुरूवात झाली असून नुकताच त्यांचा ग्रहमख सोहळा पार पडला.
-
प्रसाद-अमृताने त्यांच्या ग्रहमख सोहळ्यातील खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
ग्रहमख सोहळ्यासाठी अमृताने हिरवी साडी, दागिने आणि नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता.
-
अमृताप्रमाणे प्रसादच्याही मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
जुलै महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकत दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.
-
आता या ग्रहमख सोहळ्याने त्यांच्या लग्न विधींना सुरूवात झालेली आहे.
-
प्रसाद-अमृताच्या ग्रहमख सोहळ्यातील रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख