-
‘बिग बॉस मराठी’ फेम, ‘पुण्याची टॉकरवडी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता देशमुखने अभिनेता प्रसाद जवादेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
अमृता आणि प्रसाद या दोघांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
-
ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत अन् मग सप्तपदी असे सर्व सोहळे यावेळी पाहायला मिळाले.
-
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
-
प्रसाद-अमृताने लग्नात सप्तपदी घेताना खास मराठमोळा लूक केला होता.
-
अमृताने गुलाबी रंगाची भरजरी साडी, नाकात नथ, गळ्यात दागिने, कपाळी चंद्रकोर असा खास लूक केला होता.
-
तर प्रसादनेही बायकोला साजेसं असं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पितांबर नेसलं होतं.
-
प्रसाद-अमृताने त्यांच्या लग्नातील खास क्षणाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
-
“आमच्या आयुष्यातील जादुई दिवस १८/११/२०२३” असं खास कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले होते.
-
अमृता आणि प्रसादच्या लग्नाला अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली.
-
अभिनेत्री नम्रता संभेराव, आरोह वेलणकर, अनघा अतुल, रश्मी अनपट, सिद्धार्थ खिरीड, रसिका वेंगुर्लेकर, शुभांकर तावडे हे कलाकार उपस्थित होते.
-
यावेळी अनेकांनी “आमच्या अमुचं लग्न…” असे कॅप्शन देत पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.
हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही