-
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
-
१९ नोव्हेंबर, १९७५ रोजी बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सुश्मिता सेनचे वडील सुबीर सेन हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते, तर आई शुभ्रा सेन या ज्वेलरी डिझायनर होत्या.
-
सुश्मिता सेन ही १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स ची विजेती ठरली होती.
-
सुश्मिताचे शिक्षण हिंदी माध्यमातून झाले आहे..
-
सुरुवातीच्या काळात तिचे इंग्रजी थोडे कच्चे होते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिला एक इंग्रजीमधील प्रश्न समाजाला नव्हता.
-
या बाका प्रसंगावेळीही तिने आत्मविश्वासाने उत्तर दिले होते आणि ‘मिस युनिव्हर्स’ चा मुकुट जिंकला. तसेच तिने सांगितले की, भाषा कोणतीही असो, यश मिळवण्यासाठी ज्ञान आणि माहिती असणे गरजेचे असते.
-
सुष्मिताने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले. आज ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती १२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये आहे.
-
सुश्मिता सेन एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. अभिनया व्यतिरिक्त ती ब्रॅण्डऍम्बॅसिडर सुद्धा आहे. त्याचेही ती मानधन घेते
-
अभिनेत्री सुश्मिता सेनला महागड्या गाड्यांची आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये १.३८ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू ७ सिरीज ७३० एलडी, ३५ लाख रुपयांची Lexus LX470, ९६ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू एक्स६, ८ लाख रुपयांची Fiat Linea आणि ७ लाख रुपयांची ऑडी क्यू७ यांचा समावेश आहे.
(फोटो स्रोत: @sushmitasen47/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”