-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
आजपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची कथा २५ वर्ष पुढील दाखवणार जाणार आहे.
-
गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा आजपासून सुरू होणार आहे.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता जयदीपचा अधिराज म्हणून पुनर्जन्म होणार आहे.
-
तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे.
-
आता मालिकेतील हा मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही? हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.
-
पण या मोठ्या ट्विस्टमुळे आता मालिकेत अनेक जुने कलाकार दिसणार नाहीत.
-
मालिकेचं कथानक २५ वर्ष पुढे गेल्यामुळे बरीच नवीन पात्र पाहायला मिळणार आहेत.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील लोकप्रिय जोडी शालिनी-मल्हार आता पाहायला मिळणार नाहीयेत. अभिनेत्री माधवी निमकर हिने उत्तमरित्या शालिनी साकारली होती.
-
तर अभिनेता कपिल होनराव याने कपिल हे पात्र साकारलं होतं. पण आता हे दोघं नव्या कथानकात पाहायला मिळणार नाहीयेत.
-
तसेच मालिकेतील देवकी-उदय ही जोडी देखील दिसणार नाहीये. अभिनेत्री भक्ती रत्नपारखी आणि अभिनेता संजय पाटील या दोघांनी देवकी-उदय हे पात्र साकारलं होतं.
-
या दोन जोडींबरोबर आणखी एक तिसरी जोडी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये झळकणार नाहीये, ती म्हणजे रेणुका आणि शंकर. अभिनेत्री अपर्णा गोखले हिने रेणुका साकारली होती, तर अभिनेते गणेश रेवडेकरने शंकर साकारला होता.
-
याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांनी साकारलेली अम्मा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या पर्वात दिसणार नाहीये.
-
त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेत आता कोणत्या नवनवीत पात्रांची एन्ट्री होते? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
-
आजपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ नव्या वेळेत रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…