-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी १८ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली.
-
अमृता आणि प्रसादच्या लग्नसोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.
-
लग्नसोहळ्यासाठी अमृताने गुलाबी रंगाची भरजरी साडी नेसली होती.
-
प्रसादने पिवळ्या रंगाचा सदरा, धोतर टोपी असा मराठमोळा लूक केला होता.
-
‘Magical Day…’ असे कॅप्शन देत अमृताने लग्नसोहळ्यातील व्हिडीओ शेअर केला आहे.
-
सध्या सोशल मीडियावर अमृताच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा सुरू आहे.
-
अमृताच्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी आणि दोन वाट्याचे पेंडेंट आहे.
-
रिसेप्शन सोहळ्यासाठी अमृताने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता.
-
तर प्रसादने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
जुलै महिन्यात अमृता आणि प्रसादचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”