-
‘धूम’ या फिल्म सीरिजमधल्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन करणारे संजय गढवी यांचं नुकतंच निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेल्या या सीरिजमधील पहिल्या भागाचं दिग्दर्शन संजय यांनी केलं होतं अन् एक बॉलिवूड चित्रपटांना एक वेगळीच दिशा दिली होती.
-
२७ ऑगस्ट २००४ रोजी प्रदर्शित झालेला ‘धूम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहीट ठरला होता. संजय गढवी दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित, या चित्रपटाच्या कथेपासून कलाकारांपर्यंत सर्वकाही अव्वलच होते. या चित्रपटाने अभिषेक बच्चन ते उदय चोप्रा आणि इतर सर्वांचे नशीबच पालटले.
-
११ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१.४५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तर जगभरात या चित्रपटाने ४८.८३ कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
‘धूम १’ या चित्रपटाची संकल्पना आदित्य चोप्राच्या मनात आली जेव्हा तो आपल्या वडिलांचा १९७९ सालचा चित्रपट ‘काला पत्थर’ पाहत होता. चित्रपटाचे शीर्षक गीत देखील अमिताभ यांच्या चित्रपटातील ‘धूम मचे धूम’ गाण्यापासून प्रेरित आहे, ज्यात नंतर थोडा बदल करून ‘धूम मचाले’ असे करण्यात आले होते.
-
आधी चित्रपटात स्पोर्ट्स कार घेण्याची योजना निर्माते व दिग्दर्शक यांच्या डोक्यात होती. मात्र कलाकारांचे चेहरे दिसणार नसल्याने संजय गढवी यांनी स्पोर्ट्स बाईकच्या निवडीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.
-
यशराजचे सर्व चित्रपट हे कौटुंबिक चित्रपट असतात अन् त्यात काही भावनिक दृश्य नक्कीच आहे. पण ‘धूम १’मध्ये असा कोणताही सीन नव्हता आणि या बॅनरखाली बनलेला अशा पठडीतला हा पहिलाच चित्रपट होता.
-
चित्रपटातील जॉन अब्राहमच्या पात्रासाठी सर्वप्रथम संजय दत्तला घेण्यात आलं होतं, पण काही कारणास्तव त्याने यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. नंतर सलमान खानला या चित्रपटात घेण्याचा आदित्य चोप्रा यांचा विचार होता, परंतु नंतर या भूमिकेसाठी एक नवा चेहेरा घेण्याचं आदित्य चोप्राने ठरवलं अन् ही भूमिका जॉन अब्राहमच्या पदरात पडली.
-
संजय गढवी यांनी या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन आणि रिमी सेन यांच्यात एक जबरदस्त इंटीमेट सीन चित्रित केला होता, परंतु त्या दोघांमधील तो सीन लोकांना पसंत पडणार नाही अशी भीती संजय यांना होती त्यामुळे त्यांनी तो सीन चित्रपटातून हटवला.
-
या चित्रपटासाठी अभिनेत्री ईशा देओलने प्रथमच बिकीनी परिधान केली होती.
-
अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, उदय चोप्रा आणि ईशा देओल यांसारख्या कलाकारांसाठी हा चित्रपट सर्वाधिक हिट ठरला होता, ज्यांचे याआधी काही चित्रपट प्रदर्शित झाले होते.
-
या चित्रपटाआधी अभिषेक बच्चनला बाईक चालवण्यासाठी परवानगी नव्हती. आई-वडील जया आणि अमिताभ बच्चन यांनी अभिषेकला बाईकपासून लांबच ठेवलं होतं.
-
खास या चित्रपटासाठी अभिषेकने जॉन अब्राहमकडून बाईक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस, आयएमडीबी व सोशल मीडिया)

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…