-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेचं नवं पर्व सुरू झालं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
मालिकेच्या नव्या पर्वात जयदीपचा अधिराज म्हणून पुनर्जन्म झाला आहे. यामध्ये तो रांगड्या शेतकऱ्याच्या रुपात झळकला आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
तसेच गौरीचा देखील पुनर्जन्म झाला असून सुशिक्षित नित्याच्या रुपात ती पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)
-
मालिकेतील बऱ्याच जुन्या कलाकारांनी निरोप घेतला असून नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक नित्याच्या वडिलांच्या भूमिकेत झळकले आहेत.
-
तसेच ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत झळकलेला अभिनेता अमेय बर्वेची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री झाली आहे. अमेय नित्याचा खास मित्र ईशांतच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
-
‘रंग माझा वेगळा’ फेम सौंदर्या अर्थात अभिनेत्री हर्षदा खानविलकरही गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेत झळकल्या आहेत. त्यांनी सरपंच वसुंधरा ही भूमिका साकारली आहे.
-
याशिवाय अधिराजच्या मित्राच्या भूमिकेत अभिनेता मयुर पवार झळकला आहे. तो लवलीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती