-
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या आहेत. यातील अनेक स्टार्सनी वेटर म्हणूनही काम केले आहे. (PC : Jansatta)
-
अक्षय कुमार
अभिनेता होण्यापूर्वी अक्षय कुमारने बँकॉकमध्ये शेफ आणि वेटर म्हणून काम केलं आहे. (फोटो स्रोत : अक्षय कुमार/फेसबुक) -
बोमन इराणी
शिक्षण पूर्ण केल्यानंतर बोमन इराणी यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस कर्मचारी म्हणून दोन वर्षे काम केले. (फोटो स्रोत: बोमन इराणी/फेसबुक) -
रणदीप हूडा
रणदीप हूडा ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी गेला तेव्हा पॉकेट मनीसाठी एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करायचा. (फोटो स्रोत: रणदीप हूडा /फेसबुक) -
रणवीर सिंह
बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यापूर्वी रणवीर सिंहने वेटर म्हणून काम केलं आहे. अमेरिकेत तो स्टारबक्स कॉफी हाऊसमध्ये ग्राहकांना कॉफी देत असे. (फोटो स्रोत: रणवीर सिंह/फेसबुक) -
हर्षवर्धन कपूर
दिग्गज अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन यानेही अभिनयापूर्वी वेटरपासून कुरिअर बॉयपर्यंत वेगवेगळी कामं केली आहेत. (फोटो स्रोत: हर्षवर्धन कपूर/फेसबुक) -
सोनम कपूर
हर्षवर्धनची बहीण म्हणजेच अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर हिनेदेखील वेट्रेस म्हणून काम केले आहे. ती शिक्षणासाठी सिंगापूरला गेली होती, तेव्हा तिथे पॉकेट मनीसाठी एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करायची. (फोटो स्रोत: सोनम कपूर/फेसबुक)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य