-
अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ सप्टेंबरला थाटामाटात पार पडला.
-
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमृता-प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
थाटामाटात लग्न केल्यावर अभिनेत्रीचं सासरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
-
फुलांचा सुंदर गालिचा, दारात दिवे आणि सुंदर रांगोळी काढून जवादेंनी लाडक्या सुनेचं औक्षण केलं.
-
मराठमोळ्या आणि पारंपरिक पद्धतीने अमृताचा सासरी गृहप्रवेश करण्यात आला.
-
गृहप्रवेश केल्यावर प्रसाद-अमृतासाठी अंगठी शोधण्याच्या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
यावेळी दोघांनी एकमेकांसाठी फारच सुंदर उखाणे घेतले.
-
जवादेंच्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर अमृता आणि प्रसादने जोडीने सत्यनारायण पूजा केली. दोघांचा सत्यनारायण पूजेचा फोटो अमृताची आई आणि प्रसादच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
‘बिग बॉस’च्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.
लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल