-
निखिल नंदा हे भारतीय उद्योगपती आहेत.
-
ते महानायक अमिताभ बच्चन यांचे जावई आहेत.
-
निखिल नंदा यांचा बॉलीवूडमधील कपूर कुटुंबाशी संबंध आहे.
-
निखिल यांच्या आई रितू नंदा या राज कपूर यांची मुलगी आहेत.
-
ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे निखिल यांचे सख्खे मामा आहेत.
-
रणबीर कपूर, करीना कपूर व करिश्मा कपूर ही निखिल यांच्या मामाची मुलं आहेत.
-
श्वेताचे पती निखिल नंदा हे एस्कॉर्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
-
निखिल नंदा यांचा जन्म १८ मार्च १९७४ रोजी झाला.
-
एस्कॉर्ट्स लिमिटेड ही कंपनी निखिल यांचे आजोबा हर प्रसाद नंदा यांनी १९४४ मध्ये स्थापन केली होती.
-
निखिल यांची आई रितू नंदा या एलआयसीमध्ये विमा एजंट म्हणून काम करत होत्या.
-
निखिल नंदा यांनी डेहराडूनमधील दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
-
त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
-
निखिल नंदा यांनी ऑक्टोबर २००५ पासून एस्कॉर्ट्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम केले.
-
त्यानंतर २००७ मध्ये ते एस्कॉर्ट्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक झाले. २०१३ मध्ये ते एस्कॉर्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक झाले.
-
वडिलांच्या मृत्यूनंतर निखिल यांची २०१८ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
-
निखिल नंदा यांचं १६ फेब्रुवारी १९९७ रोजी श्वेता बच्चनशी लग्न झालं.
-
त्यांना नव्या नवेली व अगस्त्य नावाची दोन अपत्ये आहेत.
-
अगस्त्य लवकरच ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
तर नव्या नवेली ही उद्योजक आहे. तिला वडिलांप्रमाणे व्यवसायात रस आहे.
-
निखिल नंदा यांचा एस्कॉर्ट्स ग्रुप आता एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या नावाने ओळखला जातो.
-
त्यांची ही कंपनी कृषी यंत्रे, ऑटोमोटिव्ह आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अॅक्टिव्ह आहे.
-
२०२१ मध्ये, इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, निखिल नंदा यांच्या कंपनीचा महसूल ७०१४ कोटी रुपये आहे.
-
ही कंपनी १० हजारहून अधिक लोकांना रोजगार देते.
-
दरम्यान, निखिल नंदा यांना लक्झरी गाड्यांची आवड आहे.
-
त्यांच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले बेंटायगा, रोल्स रॉयस घोस्ट आणि मर्सिडीज बेंझ G63 AMG यांचा समावेश आहे. याबद्दल अॅक्टिव्ह नून या वेबसाइटने माहिती दिलीय.
-
गाड्यांव्यतिरिक्त, निखिल नंदा यांना रिअल इस्टेट व्यवसायात रस आहे. (सर्व फोटो – निखिल नंदा फेसबूक व श्वेता बच्चन इन्स्टाग्राम)
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल