-
ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी हा प्रत्येक बॉलीवूड पार्टीचा, इव्हेंटचा भाग असतो.
-
अगदी इशा अंबानीच्या मुलांच्या वाढदिवसाची पार्टी असो वा कोणताही कार्यक्रम, ओरीची हजेरी असतेच.
-
ओरी अंबानी कुटुंबाबरोरचे तसेच इतर अनके बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबरचे फोटो शेअर करत असतो.
-
बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी ‘बिग बॉस १७’ मध्ये दोन दिवसांसाठी गेला होता.
-
घरात प्रवेश करण्यापूर्वी ओरीने शोचा होस्ट सलमान खानसोबत स्टेजवर गप्पा मारल्या.
-
यावेळी त्याने त्याच्या कामाबद्दल खुलासा केला. तसेच तो सेलिब्रिटींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर का शेअर करतो हेही सांगितलं.
-
“सलमान ओरीला विचारतो की तुला जे बोलावतात त्यांना यातून काय फायदा होतो?
-
ओरी म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर त्यांना असं वाटतं की त्यांचं वाढतं वय कमी होतंय आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात.”
-
ओरी किती फोन वापरतो? असं सलमानने विचारलं. तो म्हणाला, “मी तीन फोन वापरतो, एक सकाळसाठी, एक दुपारसाठी आणि एक रात्रीसाठी. जेणेकरून बॅटरी डिस्चार्ज होणार नाहीत.”
-
तक्या फोनचे काय करतोस असं सलमानने विचारल्यावर ओरी म्हणाला, “चांगल्या फोटोंचे बरेच फायदे आहेत. तो क्षण आयुष्यभरासाठी टिकून राहतो, कारण हे फोटो आयुष्यभर सोबत राहतात. शिवाय चांगले एडिट करून ते फोटो पोस्ट करता येतात.”
-
सलमानने त्याला “तू हे फोटो कोणासाठी अपलोड करतोस?” असं विचारलं. त्यावर ओरीने उत्तर दिलं, “जगातील सर्व मुलांसाठी. मी हे सर्व त्यांच्यासाठी करत आहे. एक दिवस हजारो ओरी असतील. यासाठीच मी तयारी करत आहे.”
-
यावर सलमान म्हणाला, “मला भारताचं भविष्य दिसतंय.” (सर्व फोटो – ओरी इन्स्टाग्राम)
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?