-
नेहा पेंडसे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
नेहाने मराठी सिनेमेही केले आहेत.
-
नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती तिचा अप्रतिम अभिनय व बोल्ड अंदाजाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.
-
नेहाने तिच्या लग्नानंतर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं.
-
आज नेहाचा ३९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नेहाच्या लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल व अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराबद्दल जाणून घेऊयात.
-
नेहाच्या पतीचे नाव शार्दुल सिंह बयास आहे. त्यांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं.
-
नेहाशी लग्न करण्यापूर्वी शार्दुलचे दोन घटस्फोट झाले होते. त्याला आधीच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्येकी एकेक मुली आहेत.
-
दोन मुलींच्या वडिलांशी लग्न केल्याने नेहाला ट्रोल करण्यात आलं होतं.
-
शार्दुलच्या तिसऱ्या लग्नाचा लोकांना इतका त्रास का होतोय, असाही सवाल तिने त्यावेळी विचारला होता.
-
“यात काय मोठा विषय आहे? आजकाल करिअरला प्राधान्य देऊन अनेकजण उशिरा लग्न करतात. पण लग्नाआधी ते एकापेक्षा अधिक रिलेशनशिपमध्ये असतात. या रिलेशनशिपमधलं प्रेम, एकनिष्ठता, शारीरिक प्रेमाची गरज ही तेवढीच असते. फक्त त्यावर कायदेशीर ठपका नसतो,” असं नेहाने म्हटलं होतं.
-
-
“लोक फक्त शार्दुलच्या घटस्फोटांविषयी का बोलत आहेत? मीसुद्धा व्हर्जिन नाही,” असं नेहाने मुलाखतीत म्हटलं होतं.
-
“उलट शार्दुलने त्याचं प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केलं. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडलं. कमीत कमी शार्दुलने कमिटमेंट तरी दिली होती”, असा टोला नेहाने टीकाकारांना लगावला होता.
-
“दोन लग्नांमध्ये अपयश मिळाल्यानंतर लग्नसंस्थेवर विश्वास कायम ठेवणं काही सोपं नाही. यावरुन कळतं की त्या व्यक्तीला लग्नाचं किती महत्त्व आहे,” असं नेहाने म्हटलं होतं.
-
“लग्न करण्यापासून घाबरणाऱ्यांपैकी तो नाही. एखाद्याचं वैवाहिक आयुष्य चांगलं चालत नसेल तर त्याने ते नातं ढकलत पुढे नेण्यापेक्षा तिथेच पूर्णविराम द्यावा, याच मताची मी आहे” असं ती म्हणाली होती.
-
या नवीन नात्याला सुरुवात करताना दोघांनीही एकमेकांचा भूतकाळ आनंदाने स्वीकारल्याचं नेहाने या मुलाखतीत सांगितलं होतं.
-
“शार्दुलच्या लग्नाविषयी प्रश्न आज ना उद्या विचारले जातीलच म्हणून ती गोष्ट मी लपवून ठेवली नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांचा भूतकाळ आनंदाने स्वीकारला आहे,” असं नेहाने म्हटलं होतं.
-
नेहा पेंडसेच्या लग्नाला लवकरच चार वर्षे पूर्ण होतील.
-
ती व शार्दुल दोघेही आनंदाने संसार करत आहेत.
-
(सर्व फोटो – नेहा पेंडसे इन्स्टाग्राम)

‘ही’ आहेत किडनी खराब असण्याची नऊ लक्षणे