-
मालिकेतल्या नवनवीन ट्वीस्टकडे जितकं प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं असतं, तितकंच मालिकेच्या टीआरपीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं.
-
आपल्याला आवडणारी मालिका टीआरपीच्या यादीत कोणत्या स्थानावर आहे? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. मागील आठवड्याची (१८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरची) टीआरपी यादी समोर आली आहे. काही मालिकांच्या टीआरपीमध्ये घसरण झाली आहे तर मालिकांच्या टीआरपीमध्ये वाढ झाली आहे.
-
मागील आठवड्याच्या टीआरपीच्या यादीत प्रथम स्थानावर ‘ठरलं तर मग’ मालिका आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला ७.० रेटिंग मिळाले आहे.
-
टीआरपीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर स्टार प्रवाहची नवी मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आहे. ६.८ रेटिंग या मालिकेला मिळाले आहे.
-
मागील कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या स्थानावर असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण झाली असून आता ही मालिका तिसऱ्या स्थानावर आली आहे. या मालिकेला ६.५ रेटिंग मिळाले आहे.
-
तसेच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीआरपीमध्येही घसरण पाहायला मिळाली आहे. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चौथ्या स्थानावर असून ६.४ रेटिंग मिळाले आहे.
-
नेहमी चर्चेत असलेली ‘आई कुठे काय करते’ मालिका पाचव्या स्थानावर आली आहे. या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण झाली असून ५.८ रेटिंग मिळाले आहे.
-
२५ वर्षांचा लीप घेतलेली ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेच्या टीआरपीमध्येही मोठी घसरण झाली आहे. ही मालिका सहाव्या स्थानावर आली असून ५.८ रेटिंग मिळाले आहेत.
-
टीआरपीच्या यादीत सातव्या स्थानावर ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिका असून या मालिकेच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे. ५.० रेटिंग या मालिकेला मिळाले आहे.
-
टीआरपीच्या शर्यतीत आठव्या स्थानावर ‘आता होऊन दे धिंगाणा २’ हा कार्यक्रम असून याला ४.६ रेटिंग मिळाले आहे.
-
तसेच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ नवव्या स्थानावर आहे. या मालिकेला ४.६ रेटिंग मिळाले आहे.
-
शशांक केतकरची ‘मुरांबा’ ही मालिका टीआरपीच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. ४.१ रेटिंग या मालिकेला मिळाले आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…