-
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटात रश्मिका मंदान्ना रणबीर कपूरच्या पत्नीची म्हणजेच गीतांजली सिंगची भूमिका साकारत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावलेल्या रश्मिकाने आता हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या रश्मिकाला चित्रपट नव्हे तर व्यवसाय करायचा होता. (Still From Film)
-
अलीकडेच एका मुलाखतीत रश्मिकाने खुलासा केला आहे की, तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्याची योजना आखली होती. तिने सांगितले की हिरोईन बनणे तिच्या स्वप्नांच्या पलीकडे होते. (फोटो स्रोत: @rashmika_mandanna/instagram)
-
रश्मिका म्हणाली, मला वाटलं होतं की ग्रॅज्युएशन झाल्यावर मी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करेन. पण नशिबाने मला दुसरीकडे कुठेतरी नेलं.” (Still From Film)
-
रश्मिकाने शिकत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली आणि इथून तिच्यासाठी अभिनयाच्या दुनियेची दारे उघडली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, जेव्हा तिने तिचा पहिला चित्रपट साईन केला तेव्हा तिने याबाबत तिच्या कुटुंबियांना काहीही सांगितले नव्हते. (फोटो स्रोत: @rashmika_mandanna/instagram)
-
रश्मिकाला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी दीड लाख रुपयांचा धनादेश मिळाला होता. एवढा मोठा चेक पाहून रश्मिकाचा आनंद गगनात मावत नव्हता म्हणून तिने तो चेक तिच्या आईला दिला. चेक बघून तिची आईही आश्चर्यचकित झाली होती. (Still From Film)
-
रश्मिकाने तिच्या आईला सांगितले की तिला अभिनेत्री व्हायचे आहे. हे ऐकून तिचे वडील खूप खुश झाले. तिच्या वडिलांनाही अभिनेता व्हायचे होते, परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. (फोटो स्रोत: @rashmika_mandanna/instagram)
-
रश्मिकाने २०१६ मध्ये कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘अंजनी पुत्र’, ‘चमक’, ‘चलो’, ‘गीता गोविंदम’, ‘भीष्म’ आणि ‘पुष्पा’ यांसारख्या हिट दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले. (फोटो स्रोत: @rashmika_mandanna/instagram)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा