-
बोमन इराणी त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यांची आजही चर्चा होते.
-
पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या बोमन यांना लहानपणी डिस्लेक्सियाचा सामना करावा लागला आहे.
-
याशिवाय ते शाळेत तोतरं बोलायचे, त्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जायची. याचा खुलासा खुद्द बोमन इराणींनी ‘कौन बनेगा करोडपती १२’ या शोमध्ये केला होता.
-
बोमन सहा महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.
-
आपल्या आईच्या मदतीने बोमन त्यांच्या समस्येवर मात करण्यात यशस्वी झाले.
-
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बोमन यांनी मिठीबाई कॉलेजमध्ये २ वर्षांचा वेटर कोर्स केला आणि त्यानंतर दोन वर्षे ताज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. ताज हॉटेलमध्ये काम करण्यासोबतच त्यांनी फोटोग्राफीमध्येही हात आजमावला.
-
मात्र आई आजारी पडल्यानंतर ते आईच्या बेकरीमध्ये काम करू लागले.
-
१४ वर्षे बेकरीमध्ये काम केल्यानंतर त्यांची भेट कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्याशी झाली. त्यांनीच बोमनला थिएटरमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता.
-
थिएटरमध्ये काम करण्यासोबतच बोमन यांनी अनेक जाहिरातींसाठी ऑडिशनही दिल्या.
-
१८० हून अधिक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर बोमन यांना शॉर्ट फिल्म्सच्या ऑफरही येऊ लागल्या.
-
बोमन ४१ वर्षांचे असताना त्यांना ‘एव्हरीबडी सेज आय एम फाइन’ हा पहिला भारतीय इंग्रजी चित्रपट मिळाला.
-
वयाच्या ४४ व्या वर्षी बोमन यांनी ‘डरना जरूरी है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
या चित्रपटात ते सैफ अली खानसोबत दिसले होते. या चित्रपटात सायको किलरची भूमिका साकारून त्यांना लोकप्रियता मिळाली.
-
यानंतर ते ‘मुन्नाभाई M.B.B.S’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हे बेबी’, ‘३ इडियट्स’, ‘हाऊसफुल’ आणि ‘जॉली एलएलबी’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसले.
-
आज महागड्या अभिनेत्यांच्या यादीत बोमन इराणींचे नाव सामील झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
-
६४ वर्षीय बोमन यांनी हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, मराठी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
एका चित्रपटासाठी ते तीन ते चार कोटी रुपये घेतात. याशिवाय ब्रँड्सच्या एंडोर्समेंटसाठी ते एक कोटी रुपये फी घेतात.
-
(सर्व फोटो: बोमन इराणी/फेसबुक व इन्स्टाग्राम)
डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल