-
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने आपल्या करिअरमध्ये सुपरहिट चित्रपटांसह अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
-
अभिनेत्याच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांमध्ये ‘मेरीगोल्ड’चे नाव देखील समाविष्ट आहे. या चित्रपटाला सलमानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट म्हटलं जातं.
-
हा चित्रपट अमेरिकन दिग्दर्शक विलार्ड कॅरोल यांनी दिग्दर्शित केला होता. हा एक रोमँटिक म्युझिकल कॉमेडी चित्रपट होता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
या चित्रपटाच्या कथेत, एक अमेरिकन अभिनेत्री भारतात येते, जिथे तिची भेट एका भारतीय राजकुमाराशी होते आणि ती त्याच्या प्रेमात पडते.
-
२००७मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमेरिकन अभिनेत्री अली लार्टरची मुख्य भूमिका होती. परदेशी नायिका असूनही हा चित्रपट फारशी कमाल करू शकला नाही. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि व्यावसायिकदृष्ट्याही फ्लॉप झाला.
-
या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ ९० लाख रुपयांची कमाई केली. जगभरात या चित्रपटाने २.२९ कोटींची कमाई केली होती.
-
९० च्या दशकानंतर सलमानचा हा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट आहे.
-
भारतीय आणि अमेरिकन चित्रपटांमधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने दिग्दर्शक विलार्ड कॅरोल यांनी हा चित्रपट बनवला होती. मेरीगोल्ड हा भारतीय यशस्वी चित्रपट व्हावा अशी त्यांची इच्छा होती, पण तो यशस्वी झाला नाही. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक विलार्ड कॅरोल यांनी कोणत्याही चित्रपट निर्मितीत भाग घेतला नाही. म्हणजेच या चित्रपटानंतर कॅरोलने दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून कोणत्याही चित्रपटात काम केले नाही.
-
अभिनेत्री अली लार्टरनेही ‘मेरीगोल्ड’ नंतर कोणताही बॉलिवूड चित्रपट केला नाही. अली हा हॉलिवूडमधला एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि त्याने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (चित्रपटातून स्क्रीनशॉट)
-
(सलमान खानचे सर्व फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स