-
अभिनेता शशांक केतकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
-
कधी सोशल मीडियावर पोस्टमुळे तर कधी अभिनयामुळे शशांक चर्चेत असतो.
-
दरम्यान, शशांकला एक मुलगा आहे हे सर्वश्रुत आहे. लवकरच तो तीन वर्षांचा होईल. पण अजूनपर्यंत शशांकने लेक ऋग्वेदला सगळ्यांसमोर आणलं नाही. त्यामुळे चाहत्यांना त्याचा मुलाला पाहण्याची खूप उत्सुकता आहे.
-
नुकताच अभिनेता शशांक केतकरने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर खेळ खेळण्यात आला. तेव्हा त्याला ऋग्वेदला सगळ्यांसमोर कधी आणणार आहेस? असं विचारण्यात आलं.
-
शशांक स्पष्ट नाही म्हणत बोलला, “इतक्याच नक्कीच आणणार नाहीये. कारण आम्ही त्याला फक्त सोशल मीडियापासूनच लांब नाही ठेवलंय तर आम्ही त्याला मोबाइल, टीव्हीपासून सुद्धा लांब ठेवलंय. म्हणजे दिवसातून आम्ही त्याला काही मिनिटांच्या वर स्क्रीन दाखवत नाही.”
-
पुढे शशांक म्हणाला, “नशीबाने त्याला पुस्तकांचं भयंकर वेड लागलं आहे. तो तीन वर्षांचा व्हायचा आहे, पण त्याला सगळी अक्षरं कळतात. सगळे देव पाठ आहेत. सगळ्या आरत्या पाठ आहेत.”
-
“हे सगळं प्रियांका करून घेतेय. दोन्हीकडचे आजी-आजोबा करून घेतायत. म्हणून हे सगळं शक्य होतं. नाहीतर तो अन्यथा इतर मुलांसारखाच मोबाइलमध्ये अडकला असता. त्यामुळे आमचा हा निर्णय आहे, आता त्याला सोशल मीडियाच्या जगात आणायचं नाहीये,” असं शशांक स्पष्टच बोलला.
-
“तो खूप मोठा झाला, त्याला कळायला लागलं तर तो समोर येईलचं,” असं शशांक म्हणाला.
-
दरम्यान, शशांकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तो सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत त्याने साकारलेली अक्षय मुकादमची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख