-
बॉलीवूडमध्ये सध्या आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
मध्यंतरी आदित्य-अनन्याच्या स्पेन ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.
-
अलीकडेच अनन्या पांडेने ‘कॉफी विथ करण’च्या चॅट शोमध्ये आदित्यबरोबरच्या रिलेशनशिपवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं होतं.
-
दोघांनीही अद्याप जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.
-
दोघंही डेट करत असल्याच्या चर्चांदरम्यान, सध्या अभिनेत्रीचा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि पॅन्ट असा कॅज्युअल लूक केला होता.
-
विमानतळावर अभिनेत्रीच्या टी-शर्टवर लिहिलेल्या ‘कपूर’ या नावाने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
आदित्यचं आडनाव कपूर असल्याने अनन्याने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
दरम्यान, अनन्या पांडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर शेवटची ती ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात झळकली होती. आता लवकरत ती ‘खो गये हम कहा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणा आहे.
(फोटो सौजन्य: @varindertchawla/instagram)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा