-
धकधक गर्ल माधुरी दीक्षित ‘बकेटलिस्ट’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने या चित्रपटाची घोषणा केली होती. सध्या या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरची चर्चा सुरू आहे.
-
नुकतेच माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
या कार्यक्रमात माधुरी मुलांचं संगोपन कसं करावं? याविषयी बोलली.
-
माधुरी म्हणाली, “मुलं कोणत्या गोष्टीत हुशार आहेत? हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे.”
-
पुढे माधुरी म्हणाली, “जर तुमच्या विचारांप्रमाणे त्याची हुशारी नसेल तर ठीक आहे. कारण त्या गोष्टीत त्याला (आवडणाऱ्या गोष्टीत) रस आहे.”
-
“जर ती गोष्ट त्याची आवडची झाली तर तो नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याला ती गोष्ट आवडते. तो प्रत्येक दिवशी त्यावर प्रेम करेल”, असं माधुरी दीक्षित म्हणाल्या.
-
“जेव्हा तो सकाळी उठेल तेव्हा त्याला वाटेल मी चांगलं करतोय. त्याला हे करायला खूप आवडेल, ” असं माधुरीने सांगितलं.
-
दरम्यान, माधुरी दीक्षितचा ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ प्रदर्शित होणार आहे.
-
‘पंचक’ या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशा तगड्या कलाकार मंडळींची मांदियाळी आहे.
-
तसेच या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे आहे.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती