-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या लग्नाला नुकतीच २८ वर्षे पूर्ण झाली.
-
३ डिसेंबर १९९५ साली ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी लग्नगाठ बांधली.
-
त्यानिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
’28Yrs Of Togetherness’ असे कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्या यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
२८ व्या वाढदिवासानिमित्त खास पेस्ट्री केक आणले होते.
-
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अभिनयाबरोबरच ऐश्वर्या आणि अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात.
-
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना अमेय नावाचा मुलगा आहे.
-
अमेय लवकरच एका व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”