-
‘अॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. बॉबी देओलचा क्रूर खलनायक, रणबीरचा जबरदस्त अंदाज, रश्मिकाची डायलॉग डिलिव्हरी यांच्याबरोबरीनेच यातील आणखी एका अभिनेत्रीची जबरदस्त चर्चा होत आहे ती म्हणजे तृप्ती डिमरीची.
-
‘अॅनिमल’मध्ये एका इन्फॉर्मरची भूमिका निभावणाऱ्या तृप्ती डिमरीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
-
या चित्रपटात रणबीरबरोबरची तिची केमिस्ट्री आणि त्यातले तिचे बोल्ड सीन्स चांगलेच चर्चेत आहेत. रणबीरबरोबरचा तिचा इंटीमेट सीन सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.
-
यानंतर सोशल मीडियावर तृप्ती डिमरीच्या फॉलोवर्स मध्ये दुपटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
तृप्ती आणि रणबीरची केमिस्ट्री पाहून बरेच सिंगल लोक निराश झाले असल्याचे मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
याबरोबरच तृप्तीला नॅशनल क्रश म्हणूनदेखील जाहीर करायला हवं असे मीम्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे.
-
रातोरात एका चित्रपटातील छोट्याश्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली ही तृप्ती डिमरी आहे तरी कोण? त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
-
तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
-
श्रीदेवी व नवाझुद्दीन यांच्याबरोबरीनेच ती ‘मॉम’मध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती.
-
यानंतर तृप्तीने सनी देओल, बॉबी देओल व श्रेयस तळपदे यांच्या ‘पोस्टर बॉइज’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही काम केलं.
-
परंतु इम्तियाज अलीच्या ‘लैला मजनू’ या चित्रपटातून तृप्तीला खरी ओळख मिळाली.
-
या चित्रपटात तृप्ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
-
चित्रपटांबरोबरच तृप्तीने ओटीटी विश्वातही चांगली कामगिरी केलेली आहे.
-
नेटफ्लिक्सच्या ‘बुलबुल’ आणि ‘कला’ या दोन्ही चित्रपटांमध्ये तृप्ती मुख्य भूमिकेत दिसली.
-
दोन्हीमध्ये तृप्तीच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.
-
तृप्ती डिमरी ही अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.
-
नुकतंच त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ब्रेकअप नंतर दोघांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केलं व एकेमकांबरोबरचे फोटोजही डिलीट केले.
-
‘अॅनिमल’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून आता तृप्तीला चांगलाच मोठा ब्रेक मिळाला आहे, याचा फायदा तिच्या अॅक्टिंग करिअरमध्ये नक्कीच होऊ शकतो. (फोटो सौजन्य : तृप्ती डीमरी – इंस्टाग्राम पेज व सोशल मीडिया)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख