-
Dinesh Fadnis Death: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांचं निधन झालं, असं कारण कळतंय. दिनेश फडणीस सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो सीआयडीमधील फ्रेडी या व्यक्तिरेखेने प्रसिद्ध झाले होते.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये सीआयडीची गणना होते. या मालिकेतील जवळपास सर्वच पात्रांना खूप प्रसिद्धी मिळाली.
-
CID मधील सर्व पात्रांपैकी दिनेश फडणीस यांनी साकारलेली फ्रेडरिक ही भूमिका लोकांना आवडली होती.
-
सीआयडीने दिनेश फडणीस यांना घराघरात पोहोचवले होते. अभिनेता असण्यासोबतच दिनेश लेखकही होते.
-
दिनेशने सीआयडीचे अनेक भाग लिहिले होते. यासोबतच त्यांनी मराठी चित्रपटांचे लेखनही केले होते.
-
दिनेश टीव्हीवर येण्यापूर्वी चित्रपटांमध्येही झळकले होते. त्यांनी आमिर खानसह दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
-
दिनेश यांनी आमिरच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सरफरोश’मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती आणि ‘मेला’मध्ये ते छोट्या भूमिकेत दिसले होते.
-
दिनेश यांनी २००१ मध्ये आलेल्या ऑफिसर चित्रपटातही काम केले होते.
-
सर्व फोटो – दिनेश फडणीस इन्स्टाग्राम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”