-
अलीकडच्या काळात आपल्याला व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या माध्यमांतून मित्र व नातेवाईकांच्या संपर्कात राहता येतं. सामान्य लोकांप्रमाणे बॉलीवूड सेलिब्रिटी देखील दैनंदिन जीवनात व्हॉट्सअॅपचा वापर करतात.
-
श्वेता व अभिषेक बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात त्यांच्या बच्चन कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल खुलासा केला होता. (फोटो सौजन्य : @shwetabachchan/instagram)
-
श्वेताने सांगितलं होतं की, तिचे वडील अमिताभ बच्चन फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सर्वाधिक सक्रिय असतात आणि ते अनेकदा ग्रुपमध्ये सर्वांना विविध गोष्टींबद्दल माहिती देत असतात. (फोटो सौजन्य : @shwetabachchan/instagram)
-
लाडक्या भावाच्या बायकोबद्दल श्वेता म्हणाली होती की, ऐश्वर्या राय ग्रुपमध्ये सर्वात कमी सक्रिय असते. ती कधीच मेसेजला वेळेवर उत्तर देत नाही. ( फोटो सौजन्य : @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
आई जया बच्चन यांच्याबद्दल सांगताना श्वेता म्हणाली, एखाद्या सामान्य गृहिणीप्रमाणे ती नेहमी आमच्या ग्रुपवर ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाईट’ एवढेच मेसेज पाठवते. (फोटो सौजन्य : @shwetabachchan/instagram)
-
यावेळी अभिषेक बच्चन म्हणाला होता की, आमच्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपचा एक महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे कुठेही बाहेरगावी प्रवास करताना आम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट त्या ग्रुपवर द्यावी लागते. (फोटो सौजन्य : @shwetabachchan/instagram
-
“विशेषत: विमानाने प्रवास करताना आम्ही टेकऑफ आणि लँडिंग केल्यावर त्या ग्रुपवर अपडेट देतो.” असं अभिषेकने सांगितलं होतं. (फोटो सौजन्य : @shwetabachchan/instagram)
-
अगस्त्य नंदा या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सर्वात जास्त जोक्स आणि मीम्स पाठवत असतो असा खुलासा देखील अभिषेक व श्वेताने करण जोहरच्या कार्यक्रमात केला होता.
-
दरम्यान, बच्चन कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन, अभिषेक-ऐश्वर्या यांच्यासह श्वेता नंदा आणि तिची मुलं देखील आहेत. (फोटो सौजन्य : @shwetabachchan/instagram)

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…