-
मराठी मालिका, चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्याच्या कलेने स्वतःचा ठसा उमटवणारी नृत्यांगना म्हणजे फुलवा खामकर.
-
फुलवा खामकार हिच्या वडिलांची आज पुण्यतिथी. तिच्या वडिलांना जाऊन आज ३९ वर्षे झाली. फुलवा पाचवीला होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं, असं तिनं आज केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त फुलवाने आज खास पोस्ट केली आहे. फुलवाचे वडिलांनी वयाच्या ३६ व्या वर्षी या जगाला निरोप दिला. परंतु, अवघ्या ३६ वर्षांत त्यांनी चांगली प्रसिद्धी कमावली.
-
फुलवाचे वडील प्रसिद्ध असण्यामागचं कारण म्हणजे ते लेखक होते. त्यांची पुस्तके आजही वाचक फार आवडीने वाचतात.
-
अनिल बर्वे हे फुलवा खामकरचे वडील. ज्यूलिएटचेडोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाई ची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला , पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना, ही त्यांची गाजलेली पुस्तके.
-
अनिल बर्वे हे काळाच्या पुढचा विचार करून लिहायचे असं फुलवाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
“बाबा तुम्ही सामान्य माणूस या कक्षेत बसणारे नव्हता.पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते.इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती.आम्ही खूप लहान होतो! मी ९ वर्षांची,राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हत! असहाय्य होतो आम्ही… “, असं फुलवाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
फुलवा खामकर हिला नृत्याचं बाळकडू तिच्या आईकडूनच मिळालं. तसंच, तिच्या घरातच कलेची जाण असणारी माणसं होती.
-
आईला नृत्याची आवड, तर वडिल प्रसिद्ध लेखक असल्याने फुलवा आणि राही बर्वे (फुलवाचा भाऊ आणि तुंबाडचा लेखक) यांना कलेचं प्राथमिक शिक्षण घरातून मिळालं.
-
फुलवाने एका जुन्या पोस्टमध्ये म्हटलंय की, तिची आई उत्तम नृत्यांगना होती. तिला नाचायला फार आवडायचं. पण फार कमी वयात जबाबदारी अंगावर येऊन पडल्याने तिला नृत्य सोडून बँकेत काम करावं लागलं.
-
“आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहणं,नवीन काही करत राहणं आणि काम नसेल तेव्हा स्वतःचा व्यासंग वाढवणं, थोडक्यात निष्क्रिय नं राहणं तुझ्याकडून शिकले ना”, असंही फुलवा आईबद्दल म्हणाली होती.
-
फुलवा खामकार विविध रिअॅलिटी डान्स शोमध्ये असते.
-
तिने विविध चित्रपटांसाठी कोरिओग्रफ केलेल्या अनेक नृत्यांना उच्चस्तरीय पारितोषिकेही मिळाली आहेत.
-
फुलवा सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या आयुष्यात अनेक घडामोडी ती सोशल मीडियामार्फत शेअर करत असते.
-
सर्व फोटो – फुलवा खामकार / फेसबुक

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल