-
रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात करून सहाच दिवसात ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या कथानकावरून विविध मतं मांडली जात असली तरी चित्रपटाची गाणी सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत.
-
बी प्राकने गायलेलं सारी दुनिया जला देंगे असो किंवा भूपिंदर बब्बल यांनी गायलेलं अर्जन वैली, सोशल मीडियावर या गाण्यांची तुफान हवा आहे. पारंपरिक पंजाबी तालावर ही गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.
-
अर्जन वैली हे गाणं गुरू गोविंद सिंग यांनी तयार केलेल्या धाडी-वार संगीत शैलीत रचलेले असून, शीख योद्धा अर्जन वेलीच्या शौर्याबद्दल आणि युद्धभूमीवरील पराक्रमावर आधारित आहे.
-
ट्रेलरमध्येच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं ज्यात रणबीरचे पात्र लढत असताना त्याचे भाऊ त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं गाताना दिसतात. पण फक्त एवढंच या गाण्याचं महत्त्व नसून त्याचे काही अर्थ सुद्धा आपण जाणून घ्यायला हवेत
-
जसे की, तुम्हाला माहित आहे का की अर्जन हे कोण होते? अर्जन वैली या दोन शब्दांचा शीखांच्या इतिहासाशी खूप जवळून संबंध आहे. हे गाणे मूळत: पंजाबी लोककलाकार कुलदीप माणक यांनी रचले होते आणि ते शीख लष्करी कमांडर हरी सिंग नलवा यांचा मुलगा अर्जन सिंग नलवा यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित आहे
-
हरी सिंग नलवा हे १९व्या शतकाच्या सुरुवातीस शीख सैन्याचे कमांडर-इन-चीफ होते. अर्जनचा जन्म आजच्या लुधियानाजवळील जगरांव येथे झाला होता वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने मुघलांविरुद्ध आणि महत्त्वाचे म्हणजे भारतात त्यावेळी पसरणाऱ्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला
-
अॅनिमलच्या अर्जन वेलीच्या गाण्यामध्ये अर्जन सिंग नलवा यांनी गांडासी (युद्धाची कुऱ्हाडी) सह युद्धाच्या वेळी कसा तांडव केला याचे वर्णन केले आहे. हे गाणे एका मोठ्या युद्धाचे वर्णन करते जिथे अर्जन सिंग आपल्या कुऱ्हाडीच्या जोरावर शौर्याने लढत आहे आणि किरपानसह इतर सर्व शस्त्रे वापरत आहे.
-
हे गाणे लढाईच्या तीव्रतेचे वर्णन करते आणि शीख योद्ध्यांची तुलना शक्तिशाली प्राण्याशी करते, युद्धभूमीवर वाहणाऱ्या रक्ताचे वर्णन यामध्ये केलेले आहे. अर्जनची सिंहाशी तुलना करून, तो पोलिस आणि सरकारला पायाखाली ठेवतो असे सांगून त्याचा शेवट होतो
-
तर वैली या शब्दाचा अर्थ निडर व कोणालाही न जुमानणारा असा होतो. हे गाणे अर्जन सिंग नलवा आणि अॅनिमलचा अर्जुन यांच्यात समांतर रेखाटण्याचा प्रयत्न आहे. (सर्व फोटो: सोशल मीडिया)

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख